पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौ-यात डासॉल्ट एव्हीएशनकडून ३६ रफाएल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा जो करार केला आहे त्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौ-यात डासॉल्ट एव्हीएशनकडून ३६ रफाएल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा जो करार केला आहे त्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे.
राफएल विमानाची इंधन क्षमता कमी असून, हवाई दलाची गरज पूर्ण करु शकत नाही त्यामुळे राफएल विमान खरेदीचा करार करु नका अशी सुब्रमण्यम स्वामींनी मोदींना विनंती केली आहे.
स्वामी फक्त विनंती करुन थांबलेले नाहीत तर, सरकारने करार केला तर जनहित याचिकेव्दारे सरकारला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रफाएल खरेदी कराराचे स्वागत केले आहे.
पूर्वीपेक्षा आताच्या खरेदी करारामध्ये नियम आणि अटींमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. पुढच्या दोनवर्षात टप्याप्याने रफाएलचा भारतीय वायूदलात समावेश होईल असे त्यांनी सांगितले.
बहु राष्ट्रीय कंपन्यांची जुनी खेळी स्वामी खेळत आहेत.कंपनीचा माणूस कंपनी विरोधात न्यायालयात जातो.तेव्हा दुसर्यांना न्यायालयात जाता येत नाही.कंपनी विरोधात vatavaran थंड झाल्या नंतर कंपनी virodhatil daava मागे घेतला जातो. जय श्री राम