सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील मध्य व हार्बर मार्गाला जोडणारा ३.५ किलोमीटर लांबीचा देशातील पहिला डबल डेकर उड्डाणपूल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याचे संकेत ‘एमएमआरडीएने’ दिले आहेत.
मुंबई – सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील मध्य व हार्बर मार्गाला जोडणारा ३.५ किलोमीटर लांबीचा देशातील पहिला डबल डेकर उड्डाणपूल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याचे संकेत ‘एमएमआरडीएने’ दिले आहेत. ४२८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणा-या या प्रकल्पामुळे मुंबईकर वाहतूक कोंडीतून मुक्त श्वास घेतील.
अमर महल जंक्शन, वाकोला, शीव आणि कुर्ला परिसरातील वाहतूक कोंडी आणि त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर कलानगर आणि शीव जंक्शनवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. सांताक्रूझपासून चेंबूपर्यंत आणि पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तासाचे अंतर पार करावे लागते. आता या प्रकल्पामुळे फक्त १५ ते २० मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहनचालकांना पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी तीन मार्ग असणार आहेत. डबल डेकर उड्डाणपुलाच्या खालील मार्गावर ये-जा करण्यासाठी प्रत्येकी दोन मार्ग असतील. डबल डेकर उड्डाणपुलाच्या खालील मार्गावर पदपथ आहे.
कुर्ला स्थानकाकडून लोकमान्य टिळक स्थानकाकडे जाण्यासाठी ये-जा करण्यासाठी या पदपथांचा प्रवाशांना वापर करता येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
खुप छान बातमी आहे. पण वेस्टर्न ऎप्रेस हायवेला सांताक्रुझ येथे मराठा कॉलनि आणि वाकोला पोलिस स्थानक येथे हा लिंक रोड मिळतो. भविष्यात येथे होणाऱ्या ट्राफिक जामच काय?