महानायक अमिताभ बच्चन यांचं क्रीडाप्रेम जगप्रसिद्ध आहे. चित्रपटांनंतर सर्वात जास्त कशावर त्यांचं प्रेम असेल तर ते, खेळांवर
महानायक अमिताभ बच्चन यांचं क्रीडाप्रेम जगप्रसिद्ध आहे. चित्रपटांनंतर सर्वात जास्त कशावर त्यांचं प्रेम असेल तर ते, खेळांवर! केवळ आपल्या शब्दांनीच कोणत्याही खेळाडूला प्रेरणा मिळते, याची त्यांना जाण आहे. त्यासाठीच तर ते नेहमी कोणत्याही खेळाडूला प्रोत्साहन आणि धीर देत असतात.
बरं आता ते इथवरच थांबलेले नाहीत, तर त्याही पुढे जात दोन अॅथलिट खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलून आपल्या ‘दिलदार’पणाचा त्यांनी प्रत्यय दिला आहे. येणा-या राष्ट्रकुल व अशियाई स्पर्धेत उतरणा-या अयोनिका पॉल व पूजा घाटकर या खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा खर्च अमिताभ करणार आहेत.
हे दोन्ही खेळाडू रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची कामगिरी लक्षात घेऊनच, या खेळातील कामगिरी आणखी उंचावी, या उद्देशाने बच्चन यांनी हा निर्णय घेतला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अमिताभ ही मदत या खेळाडूंपर्यंत पोहोचवणार आहेत.
तू सच्चा शहेनशाह बाकी सब कंगाले नबाब.