शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गरम मटण आणि थंडगार दारु एकत्ररित्या जास्त ‘टेस्टी’ लागतात.
वॉशिंग्टन – खवय्ये लोक दारुसोबत मटण का खातात? झणझणीत तिखट मटणासोबत थंडगार दारु पिणं लोकांना का आवडतं? शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गरम मटण आणि थंडगार दारु एकत्ररित्या जास्त ‘टेस्टी’ लागतात. म्हणजे खवय्यांना या दोन्ही पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेता येऊ शकतो.
मात्र हा आस्वाद घेण्यासाठी जीभेची भूमिका फार महत्वाची ठरते. प्रत्यक्षात ह्या दोन्ही पदार्थांचं तापमान विरुद्ध आहे. त्यामुळे मटण आणि दारु एकत्र घेतल्याने जीभेवर त्याचा विरुद्ध परिणाम होतो. आपण जे अन्न खातो त्याचे अन्नरस आपल्या जीभेवर तराळतात, असं रुटगर विद्यापीठाचे पाऊल ब्रसीन यांनी सांगितले. दारुचा ‘सीप’ जीभेवर कडू आणि ‘ड्राय इफेक्ट’ करतो. त्याचप्रमाणे मटण हे चरबीयुक्त असल्याने पटकन गिळता येतं. अशा वेळी दोन्ही पदार्थांचं एकत्र सेवन केल्याने त्याचे विरोधी गुणधर्म एकत्र होतात, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
khupacha tasty aahe