लग्नसोहळ्यातील वरातीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे लावण्यास मनाई केली म्हणून भाजपा आमदाराने एका कॉन्स्टेबलला मारहाण केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली.
हैदराबाद – लग्नसोहळ्यातील वरातीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे लावण्यास मनाई केली म्हणून भाजपा आमदाराने एका कॉन्स्टेबलला मारहाण केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली. या प्रकरणी भाजपाचे आमदार राजा सिंग आणि त्यांचे सहकारी यांच्यावर मंगलघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरामघर कॉलनीमध्ये शनिवारी एका लग्नाच्या वरातीदरम्यान मोठमोठ्याने डीजे वाजवला होता. याविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या कॉन्स्टेबलने डीजे बंद करायला लावला. डीजे बंद केल्यामुळे चिडलेल्या आमदाराने त्या कॉन्स्टेबलला मारहाण केली तसेच शिवीगाळही केली.
याप्रकऱणी त्या कॉन्स्टेबलने आमदार आणि त्याच्या सहका-याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राजा यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट तो तो कॉन्स्टेबलच दारु पिऊन आला होता असे राजा यांनी म्हटले आहे.
आता मोदी का गप्प आहेत ? जनतेचा घोर अपेक्षाभंग झाला आहे.