याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे.
नवी दिल्ली – याकूब मेमनला फाशी होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया अर्जावर भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची स्वाक्षरी असणे लज्जास्पद बाब आहे.
याकूबसाठी दयेची मागणी करणा-या अर्जावर भाजपा खासदाराची स्वाक्षरी असणे दु:खद असून, शत्रुघ्न सिन्हा यांची भूमिका पक्ष विरोधात असल्याचे जेटलींनी सांगितले.
सिन्हा यांनी स्वाक्षरी करणे पक्षासाठी लज्जास्पद आहे ? या प्रश्नावर जेटली म्हणाले की, निश्चितच उलट तुम्ही हा प्रश्न ज्यांनी स्वाक्षरी केली त्यांना विचारला पाहिजे.
मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कोणतीही दया दाखवू नये अशी आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे जेटलींनी सांगितले.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पहिल्यांदा पक्ष विरोधी भूमिका घेतलेली नाही. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी पक्षावर असलेली आपली नाराजी प्रगट केली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना नुकतीच त्यांनी भाजपाचे मुख्य स्पर्धक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती.
That hits the target peelfctry. Thanks!