पुण्याजवळील वडकी येथे दलित महिलेवर दोन अज्ञात इसमांनी घरात घुसुन बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे.
पुणे- पुण्याजवळील वडकी येथे दलित महिलेवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी दोन अज्ञात इसमांनी घरात घुसुन या पीडित महिलेवर बलात्कार केला. पुणे-सासवड रस्त्यावर हडपसरजवळ वडकी गावात ही घटना घडली. पीडित महिला १९ वर्षाची असून विवाहित आहे.
महिलेच्या दीराचा परिवार गावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. पीडीत महिलेला दीराच्या घराचे दार उघडे दिसल्यामुळे ती त्या घरात कोण आहे हे पाहण्यासाठी त्या घरात गेली. त्याचवेळी त्या घरात असलेल्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करणारे दोघे, चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेले असावे असा संशय पोलिसांना आहे.
घटना घडली त्यावेळी भारनियमनामुळे वीज गेली होती. पीडित महिलेवर सध्या ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लोणी-काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिची जात अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद..