पंढरपूरच्या पांडुरंगाचा गाभारा सुवर्णजडीत करण्याची घाई काही लोकांना झाल्याने वारक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई – सोनेरूपे आम्हा मृत्तिके समान। माणिक पाषाण खडे जैसे॥ म्हणणा-या भाबडय़ा वारक-यांचा देव असणा-या पंढरपूरच्या पांडुरंगाचा गाभारा सुवर्णजडीत करण्याची घाई काही लोकांना झाल्याने वारक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जगातला एकमेव देव आहे ज्याला वारकरी उराउरी भेटून, त्याच्या पायावर डोके ठेवू शकतात. मात्र सोन्याचा गाभारा झाला तर आपल्याला थेट देवाजवळ प्रवेश मिळण्यात अडचणीत येतील आणि देव आणि भक्तांमध्ये अंतर पडेल, अशी भीती वारक-यांना वाटत आहे. शनिवारी आळंदी येथील ह.भ.प. मारुती महाराज कराडकर यांच्या मठामध्ये झालेल्या राज्यातील कीर्तनकारांच्या बैठकीत सुवर्णलेप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाभारा सुवर्णजडीत झाला तर पंढरपूरच्या वैभवात भर पडेल, असे सांगत मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे आणि आळंदी-देहू-पंढरपूर विकास समितीचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी समर्थन केले आहे. तर मंदिर समितीचे एक विश्वस्त वसंत पाटील यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. देवस्थान समितीने आधी वारक-यांच्या प्राथमिक सोयी-सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वारक-यांनी केली आहे.
आज पंढरपुरात वारकर्याला मुलभूत सुविधा देखील मंदिर प्रशासन आणि शासन पुरवू शकले नाही आपण दर आषाढी एकादशीची जुनी मुख्यमंत्र्यांची भाषणे ऐकली तर आम्ही वारकऱ्यांना पायाभूत सुविधा पुरवू अशी आश्वासने ऐकाल पायाभूत सुविधा म्हणजे पंढरपुरात ज्या चंद्रभागेत स्नान करतो तेथे धड शौचालायची देखील सुविधा प्रशासन पुरवू शकत नाही त्यामुळे चंद्रभागेत स्नान करून शुद्ध व्होन्याऐवजी अशुद्धच होऊन पांडुरंगाचे दर्शन वारकर्याला घ्यावे लागते वारीच्या वेळेत शौचकुपांची सफाई होणे गरजेचे असते पण त्यांच्या ताक्क्यांतून अक्षरशा मलमूत्र वाहत चंद्रभागेत मिसळत असते आणि याच घाण झालेल्या पाण्यात वारकरी आंघोळ करताना आपणास दिसतो हे वारीचे कटू अनुभव मी आपणास सांगत आहे…त्यामुळे ज्या देवाला त्याच्या भक्तांची ओढ जास्त आहे त्या देवाच्या गाभार्याला सोन्याने मढवल्यामुळे काही देव प्रसन्न होणार नाही त्याच्या भक्तांना सुविधा द्या पहा पांडुरंगाच्या मुखाचे तेज आजून उठून दिसेल
itihas pusun takanyacha anakhi eak prayatna.