भारतरत्न आणि क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरचे रिओ दी जानिरो शहरातील येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यासोबतचे छायाचित्र वादग्रस्त ठरले आहे.
मुंबई- भारतरत्न आणि क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरचे रिओ दी जानिरो शहरातील येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यासोबतचे छायाचित्र वादग्रस्त ठरले आहे.
येशूच्या पुतळ्याची ‘कॉपी’ करणारे छायाचित्र सचिनच्या अधिकृत ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ करण्यात आले आहे. त्यावरील प्रतिक्रिया पाहता ‘सचिनने असे करायला नको होते,’ अशीच समस्त चाहत्यांनी भावना व्यक्त केली आहे.
रिओतील छायाचित्र ‘पोस्ट’ केल्यानंतर, ‘मी कुठे आहे, हे ओळखलेत का?’ असा प्रश्न सचिनने चाहत्यांना केला आहे. त्या बरोबरच ‘क्रिकेटचा देव ख-या खु-या देवाला भेटला’ असेही म्हटले आहे. त्यावर चाहत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अक्षय म्हणतो की, ‘सर, असे फोटो काढू नका. लोक तिथे तुमचा तसाच एक पुतळा बनवतील.’ ख्रिश्चन समाजाला तुमचे हे वागणे रुचणार नाही. तर कुठल्याही हिंदू देव-देवतेच्या समोर अशा प्रकारे ‘पोझ’ देऊ नका, असे मुन्नाभाई नामक चाहत्याचे म्हणणे आहे.
जगभरातील क्रिकेटचाहत्यांचा आदर्श असलेल्या सचिनकडून ही अपेक्षा नव्हती, असे ज्ञानशेखरला वाटते.
Any guesses for where I am? The #Olympics2016 buzz has made this place even more lively and beautiful! pic.twitter.com/xplbntkMr6
— sachin tendulkar (@sachin_rt) August 5, 2016
.@sachin_rt sir aise photos mat click karo log aise hi ek statute aapka yaha bana denge
— Akshay (@ComedyBanda) August 5, 2016
Its ok not so serious . he is also a human being he was excited like us . thats all