स्वत:चं एक हक्काचं घर असावं, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, न परवडणा-या व्याजदरांमुळे घर खरेदीची सामान्यांची योजना ही कल्पनाच राहते. सामान्यांच्या घर खरेदीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी रश्मी हाऊसिंगने ‘अपने दम पर’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेचं वैशिष्टय म्हणजे व्याजदर मुक्त इ. एम.आय. (इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट) त्यामुळे सर्वसामान्यांचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल, असा ‘रश्मी हाऊसिंग’चा दावा आहे.
आजच्या काळात परवडणारी घरं ही काळाची गरज बनत आहे. परंतु अशी घरं उभी करणं हे तितकंच कठीण आहे. स्टॅम्प डय़ुटी, प्रॉपर्टी टॅक्स आणि बांधकामासाठी येणारा इतर खर्च मिळून आपल्या बजेटमध्ये बसतील अशी घरं ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी रश्मी हाऊसिंगने मदतीचा हात पुढे केलेला आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील तसंच नायगाव (पूर्व) इथे रश्मी हाऊसिंगचा ‘स्टारसिटी’ हा 150 इमारतींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील घरांसाठी रश्मी हाऊसिंगने ‘अपने दम पर’ही योजना सुरू केली आहे. या योजनेचं वैशिष्टय़ म्हणजे व्याजदरमुक्त इ.एम.आय. ही योजना ‘घर हो तो ऐसा’ या नावानेही ओळखली जाते. 2010 सालापासून ‘रश्मी हाऊसिंग’ने सुरू केलेल्या या अनोख्या गृहखरेदीच्या प्रकल्पाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गृहकर्ज मिळण्यासाठी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता असते. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे सक्षम असूनही काही अर्जदार, ग्राहक घर घेण्यास अपात्र ठरतात. म्हणजे इ.एम.आय. भरण्यासाठी रेग्युलर इन्कमशी संबंधित कागदपत्रं पुरवू शकत नसल्यामुळे गृहकर्जासाठी पात्र ठरत नाही. अशा काही ग्राहकांसाठी रश्मी हाऊसिंगने आपली ‘अपने दम पर’ पेमेंट प्लान ही सुविधा सुरू केली आहे.
या सुविधेमध्ये ग्राहक काही ठरावीक रक्कम देऊन आपल्या घराची बुकिंग करू शकतो. यानंतर उरलेले पैसे पुढील पाच वर्ष हप्त्यांप्रमाणे आणि शेवटी घराचा ताबा मिळण्याच्या वेळी देऊ शकतात. शिवाय बँका आणि इतर वित्तीय संस्था याप्रमाणे यावर कुठलेही व्याजदर न लावता शून्य टक्के व्याजदरावर ग्राहक हे पैसे भरू शकतो. साधारणत: 18 ते 20 लाखांपर्यंतचं घर विकत घेण्यासाठी आपण 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज घेतलं जातं. या गृहकर्जाला महिन्याकाठी 12 ते 15 हजार रुपयांचा इ.एम.आय. भरावा लागतो. आणि तोही 20 वर्षाच्या काळासाठी. म्हणजेच घरासाठीचा एकूण खर्च 30 लाख रुपये इतका होतो. रश्मी हाऊसिंगच्या ‘अपने दम पर’ या योजनेतून ग्राहकाला व्याजाचे एकूण 10 लाख रुपये वाचवता येतात. या योजनेत ग्राहकाला एकूण 50 महिन्यांपर्यंत 12 हजार रुपये ही रक्कम कोणत्याही प्रकारचं व्याज न देता भरायची असते. ‘अपने दम पर’ या योजनेत ग्राहक 5 वर्षात आपण घेतलेल्या नवीन घराची सगळी किंमत देऊ करतो. या उलट गृहकर्जामुळे हीच रक्कम फेडण्यास त्याला 15 ते 20 वर्षाचा कालावधी लागतो. यातील घरं ही सेमी फर्निश्ड फ्लॅट्सच्या सुविधांनी सज्ज आहेत.
त्याचप्रमाणे ‘अपने दम पर’ या योजनेत घराचं पझेशन मिळेपर्यंत एकूण रकमेच्या 30 टक्के रक्कम ही ग्राहकाकडे शिल्लक म्हणून ठेवली जाते. विकासकाने लवकरात लवकर प्रकल्पाचं काम पूर्ण करून घराचा ताबा ग्राहकाला मिळावा, त्यासाठी ही सुविधा ठेवण्यात आली आहे. ती ग्राहकांसाठी उपयुक्त अशीच आहे, असा रश्मी हाऊसिंगचा दावा आहे. या हाऊसिंग संस्थेने त्यांच्या 12 वर्षाच्या वाटचालीमध्ये 7,000 समाधानी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. याप्रकारे रश्मी हाऊसिंग नेहमीच ग्राहकांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर योजना तसंच सुविधा यांसाठी प्रयत्नशील आहे.
MALA TUMCHA YAJANA BDDAL MAHI PAHIJE
sindhudurgathi hi abhinav yojana rabawavi