मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील प्रसुतीगृहांमध्ये प्राथमिक सेवा-सुविधाही दिल्या जात नाहीत. ही प्रसूतिगृहे म्हणजे गुरांचे गोठे बनल्याचा घरचा अहेर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधा-यांना बुधवारी दिला.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील प्रसुतीगृहांमध्ये प्राथमिक सेवा-सुविधाही दिल्या जात नाहीत. ही प्रसूतिगृहे म्हणजे गुरांचे गोठे बनल्याचा घरचा अहेर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधा-यांना बुधवारी दिला. प्राथमिक सुविधा पुरवल्या जात नसल्यास ही प्रसूतिगृह बंद करण्यात यावी. सत्ताधारी पक्ष म्हणून प्रशासनावर आपला अंकूश कमी होत असल्याचेही टीका त्यांनी केली.
स्थायी समितीच्या बैठकीत रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या साहित्यांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीला आला. तेव्हा काँग्रेसचे प्रविण छेडा यांनी शीव रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर, आयसीयूबाहेर आणि रक्तपेढीबाहेर कुत्रे बसलेले असतात. सुरक्षा असतानाही हे कुत्रे कसे काय आत शिरतात, असा सवाल त्यांनी केला.
प्रसूतिगृहात रुग्णवाहिका असते, परंतू रात्री ती चालवायला चालकच नसतो. त्यामुळे रात्रीही कायम चालक ठेवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी यांनी केली.
स्त्री रोग तज्ज्ञांची पदे भरली जातील असे आश्वासन पालिका देते. मात्र, किती पदे भरली अशी विचारणा डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी केली. अनेक रुग्णालय आणि प्रसूतिगृहांमध्ये कामगार नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना सर्व कामे करावी लागतात. प्रसूतिगृहांमध्ये दाखल होणा-या महिलांना बसण्यास जागा नाही. डॉक्टर आणि नर्स या महिलांशी अश्लील भाषेत बोलतात,अशी टीका सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली.
व्हेंटीलेटरअभावी मृत्यू होणे ही गंभीर बाब असून कोणत्या रुग्णालय, प्रसूतिगृहांमध्ये व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे, याची माहिती घ्यावी, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली.
आरोग्यावर श्वेतपत्रिका काढा
महापालिकेच्या सर्व रुग्णालये,दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये सुविधांचा अभाव आहे. या दुरवस्थेला जबाबदार कोण असा सवाल करत भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी आरोग्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. डॉक्टर आणि अधिष्ठाता यांच्या पदोन्नतीत राजकारण होत असल्याने पालिका बदनाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
केईएममध्ये शवागाराच्या वर रक्त तपासणी प्रयोगशाळा
केईएम रुग्णालयातील अपघात विभाग दुस-या बाजुला हलवला. शवागाराच्या वरच रक्त तपासणी प्रयोगशाळा आहे. त्यामुळे एखादी महिला दिवसा किंवा रात्री याठिकाणी कशी जावू शकते, असा सवाल करत सुनील मोरे यांनी ही प्रयोगशाळा दुसरीकडे हलवावी, अशी मागणी केली.
शीव रुग्णालयात रात्रीच्यावेळी एकच कंत्राटी सुरक्षा रक्षक तैनात असतो. रात्री अपघात झाल्यास रुग्णांना उपचारासाठी आणले जाते. अशावेळी आणिबाणीची परिस्थिती उद्भवल्यास हे सुरक्षा रक्षक काय करणार असा सवाल तर काँग्रेसचे सुनील मोरे यांनी कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी केली.
In India If your helth, Menister is not having baground on medical site what you think about facilitey, and 7th class pass ledy can be a CM then what we expect from your Netaji, we have to change or big March more then Dandi March, is required in India, or we fight for our self for right fredom