ही छायाचित्रे कोणत्या अड्डयांची किंवा पडिक गोदामांची नसून, ही छायाचित्र आहेत, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली पश्चिमकडील भुयारी मार्गाची.
मुंबई – ही छायाचित्रे कोणत्या अड्डयांची किंवा पडिक गोदामांची नसून, ही छायाचित्र आहेत, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली पश्चिमकडील भुयारी मार्गाची. दिवसा या भुयारी मार्गातून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्याजवळ ‘बॅटरी’ ठेवावीच लागेल. कारण या भुयारी मार्गात दिवे नाहीत, मात्र या भुयारी मार्गातील दुकानांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भुयारी मार्गात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते, ते असंख्य हारवाल्यांचे. थोडेसे उजव्या हाताला वळले की, रंगांचे निघालेले पापुद्रे, दिवे नसलेला भकास मार्ग, स्वच्छतागृहांची अस्वच्छता आणि दुर्गंधी यासारख्या असंख्य समस्या आपल्यासमोर उभ्या असतात. सगळ्यात घातक आणि भीतीदायक असतो, तो येथील दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा वावर.
गर्दुल्ल्यांचा वाढता वावर आणि फेरीवाल्यांमुळे या भुयारी मार्गाची अवस्था भयाण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्ध, गरोदर स्त्रिया, शाळेत जाणारी मुले, अंपग व्यक्तींना सहन करावा लागत आहे.
मुनिसिपाल्तीचे वार्ड ऑफिसर्स झोपा काढीत बसले आहेत कि काय ????