लिफ्टमध्ये अडकल्याने एका २३ वर्षीय तरूणीचा मालाडमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई- सेन्सर खराब झाल्याने लिफ्टमध्ये अडकल्याने एका २३ वर्षीय तरूणीचा मालाडमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईच्या मालाडमधील ‘मुज्दिल्फा’ या दहा मजली इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आलिया असे या तरुणीचे नाव आहे.
आलिया काही कामानिमित्त तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर जात होती. तळ मजल्यावर ती लिफ्टमध्ये गेली. ती लिफ्टमध्ये पूर्ण पोहोचण्यापूर्वीच लिफ्टचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे आलिया अर्धी आत आणि अर्धी बाहेर अशी अडकली.
लिफ्टचे सेन्सर खराब झाल्यामुळे लिफ्ट तशीच वरच्या मजल्यावर निघाली. त्यामुळे दरवाजात अडकलेल्या या तरुणीचा लिफ्ट आणि वरच्या मजल्याचे छत यात चेंगरुन दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
अतिशय दुर्दैवी घटना ! rest इन piece !!