पत्रकार जगेंद्र सिंग यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.
लखनऊ – पत्रकार जगेंद्र सिंग यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.
एक जून ऱोजी सिंग यांच्या अंगावर केरोसीन ओतून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. आठ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या समूहाने तसेच राज्यमंत्री राम मूर्ती वर्मा यांच्याशी संबंधित लोकांनी सिंग यांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सिंग यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी कऱणाची जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थेने ११ जून रोजी ही याचिका दाखल केली आहे. येत्या १५ जूनवर यावर सुनावणीची शक्यता आहे. ही घटना अतिशय गंभीर असून याची सीबीआय चौकशी केली जावी असे याचिकेत म्हटले आहे. तसेच सिंग यांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई दिली जावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
निषेध निषेध निषेध. दोषींना कडक शासन व्हावे