हा कोकणी लोकांच्या खाद्यपदार्थात सर्रास वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. हिंदीत ‘तिलफडा’ आणि मराठीत ‘तिरफळ’ या नावाने ओळखला जातो.
हा कोकणी लोकांच्या खाद्यपदार्थात सर्रास वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. हिंदीत ‘तिलफडा’ आणि मराठीत ‘तिरफळ’ या नावाने ओळखला जातो. भारतात प्रामुख्याने गोवा तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठया प्रमाणात लागवड होते. तिरफळ हे नावाप्रमाणेच एक छोटंसं फळ असून ते पावसाळ्यात अधिक प्रमाणात येतं. त्यात हिरवट रंगाचं बी असून सुकल्यावर ते तपकिरी रंगांचं होतं. सुकल्यावर ते फोडून आतील काळ्या रंगांची बी दिसते. या बिया काढून टाकल्या जातात. केवळ बाहेरच्या आवरणाचा वापर केला जातो. याचा स्वाद व गंध काहीसा उग्र असतो. कोकणपट्टीतील मांसाहारी पदार्थात या तिरफळाचा अधिक वापर केला जातो. स्वयंपाकात वापरण्यापूर्वी भाजून त्याची पूड केली जाते.
त्याचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे –
» जुलाब किंवा अतिसार होत असल्यास त्याची पूड पाण्यासोबत घेतल्यास आराम पडतो.
» उत्तम पाचक म्हणून काम करते.
» नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
» डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
» मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रित राखण्यास मदत करते.
अस्सल मालवणी आणि गोव्याची त्रिफळ घालून केलेली ” बांगडा कडी ” उकड्या तांदळाच्या भाता बरोबर
खाऊन तर बघा , एकदम झक्कास !!!!!!!!!!