संसदेत उपस्थित न राहिल्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून सचिन तेंडुलकरवर टीका केली जात आहे. मात्र सभागृहात आपण का उपस्थित राहू शकले नाही याचे कारण त्याने शुक्रवारी दिले.
नवी दिल्ली- माजी क्रिकेटपटू तसेच राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर संसदेत उपस्थित राहत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर जोरदार टिका होत आहे. मात्र मोठ्या भावाच्या बायबास शस्त्रक्रियेमुळे आपण दिल्लीत येऊ शकलो नाही. उपस्थित राहलो नाही याचा अर्थ असा नव्हे की सभागृहाचा अवमान करायचा आहे, असे सचिनने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
माझे दिल्लीत येण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मला संसदेचा अवमान करायचा आहे, असे सचिनने म्हटले आहे.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन म्हणाला, इंग्लंडहून परतल्यानंतर मला मी संसदेत येणार होते. मात्र मोठ्या भावाची (अजित तेंडुलकर) बायबास शस्त्रक्रीया असल्यामुळे मला राज्यसभेत उपस्थित राहता आले नाही. ही गोष्ट मला सर्वांना सांगायची नव्हती असेही सचिनने स्पष्ट केले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात सचिनने खेळाडूंना मार्गदर्शन केले.
राष्ट्रपतींद्वारे मास्टर ब्लास्टर सचिनची एप्रिल २०१३मध्ये राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सचिन केवळ तीन वेळा सभागृहात उपस्थित राहीला होता. १३ डिसेंबर २०१३ रोजी सचिन अखेरचा सभागृहात हजर होता. सचिनच्या या अनुपस्थितीवरून राज्यसभेतील अनेक सदस्यांनी टीका केली होती.
ह्या ” कुबेराला ” माननीय राष्ट्रपतींनी राज्यसभेच सदस्यत्व बहाल केले ,परंतु ??????.