मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये यापुढे रक्त आणि थुंकीच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये यापुढे रक्त आणि थुंकीच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्यांदाच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याने अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ होणार आहे. या चाचण्या लवकरच सुरू होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शहरातील लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांत उपचाराकरता येणारे रुग्ण यांचा विचार करता, बहुतांश रुग्ण हे झोपडपट्टय़ा आणि मध्यम वस्त्यांतील आहेत. महापालिका रुग्णालयांत येणारे रुग्ण हे मधुमेह, हृदयविकार अशा आजारांनी त्रस्त असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने याबाबत एक उपक्रम राबवायचा ठरवले. त्यानुसार झोपडपट्टय़ांमध्ये किती रुग्ण राहतात, ते बहुतकरून कोणत्या आजारांनी त्रस्त आहेत, आदींची माहिती घेण्यात आली.
लिंकेज प्रोग्राममधील बाबी तपासून महापालिकेने शहरात मुंबई आरोग्य अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रुग्णांचा विचार करता, झोपडपट्टय़ांमधील रुग्ण हे प्राथमिक उपचाराकरता दवाखान्यांमध्ये जातात. वैद्यकीय सल्ला किंवा अधिक उपचाराकरता ते रुग्ण महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत जातात. तेथे गेल्यावर काही चाचण्या करण्यास सांगितले जाते. मात्र काही कारणांस्तव त्या चाचण्या खासगी ठिकाणी केल्या जातात. सर्वसामान्य रुग्णांना या महागड्या चाचण्या करणे शक्य नसते. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानुसार या रुग्णांवर दवाखान्यातच चाचण्या केल्या तर त्याचा फायदा होईल आणि वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये गर्दी होणार नाही, हा यामागील पालिकेचा उद्देश आहे.
[poll id=”339″]
महापालिकेच्या १६८ रुग्णालयांमध्ये येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने रक्त चाचण्या, थुंकी चाचण्या केल्या जाणार आहेत. लवकरच या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.
मधुमेह चाचण्यांना प्रतिसाद
मुंबई आरोग्य अभियानांतर्गत ‘मिशन मधुमेह’ हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खास डॉक्टर नेमण्यात आले आहेत. या उपक्रमालाही रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
mi chunabhatti vibhagat rahato. thithe mahapalikeche hospital sakali 10.15 la ughadate aani 12.30 la bhandha hote. chaukashi keli tar sangtat ki aamhi lanboon yeto tyamule vell lagto.. Dr. changle hahet, pan staff velevar yet nahi ani ghari lawkar jatat.. tyamule vibhagatil lokana yacha fayada hot nahi…