पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभि्यानात विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी, चित्रपट कलाकार सहभागी होत आहेत.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभि्यानात विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी, चित्रपट कलाकार सहभागी होत आहेत. मात्र बॉलिवडूचा सुपरस्टार शाहरुख खानने या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
हाती झाडू घेऊन, रस्त्यावर साफसफाई करणार नसल्याचे शाहरुखने म्हटले आहे. शाहरुख हाती झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई करताना दिसणार नसला तरी, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान आणि अन्य सेलिब्रेटी जी मेहनत घेत आहेत त्याचे शाहरुखने कौतुक केले आहे.
अमिताभ बच्चन, सलमान खान, प्रियंका चोप्रा, अनिल अंबानी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या मोहिमेत सहभागी झाले आहेत. सर्वसामान्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचावा यासाठी या सेलिब्रेटींनी रस्त्यावर साफसफाई करतानाचे आपले फोटो टि्वटरवर अपलोड केले आहेत.
या मोहिमेत सहभागी होणारा प्रत्येक सेलिब्रेटी अन्य नऊ नावे सुचवतो. त्यातून साखळी तयार होते. सानिया मिर्झाने शाहरुखचे नाव सुचवले होते.
अरे बेटा ,फिल्म कि शूटिंग समझ कर हाथ मे झाडू पकड कर थोडा रास्ता साफ कर
दिया तो कौनसा आसमान गिरने वाला है ???