स्वित्झर्लंड- शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले असून याद्वारे चक्क कृत्रिम हृदय तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
हृदयविकार आणि हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत असताना आता शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. अॅडव्हांस थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाने चक्क कृत्रिम हृदय तयार करण्यात आले आहे.
ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्यावेळी दाता मिळत नसल्यामुळे अनेकांचा जीव जातो. दुसरे हृदय मिळेपर्यंत डॉक्टर ब्लड पंप्सच्या मदतीने रुग्णाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण कृत्रिम हृदयामुळे रुग्णाला संपूर्णपणे नवे हृदय मिळते.
शास्त्रज्ञांनी ३डी प्रिंटींग तंत्रज्ञानातून सिलिकॉनचे हृदय बनवले आहे. सिलिकॉनचा वापर असल्याने हुबेहूब मानवी शरीरातल्या स्नायूंप्रमाणे याची बनावट आहे. तसेच याचे वजन केवळ ३९० ग्रॅम असणार आहे. महत्वाचे म्हणजे मानवी हृदय जसे काम करते, तसेच हे कृत्रिम हृदय देखील काम करते. नुकतचे स्वित्झर्लंड मधल्या “ईटीएच ज्युरिक” या रिसर्च सेंटरमध्ये याची चाचणी पार पडली आहे.
सध्या हे हृदय ३००० वेळा पम्पिंग करण्याच्या क्षमतेचे आहे. याचा अर्थ ४५ मिनिटापर्यंत हे कृत्रिम हृदय काम करू शकते. परंतू शास्त्रज्ञांच्या मते ही फक्त एक पायरी आहे. पुढे यात आणखी प्रगती करण्यात येईल आणि भविष्यात चक्क कृत्रिम हृदय बसवण्यात येईल, असेच या संशोधनातून दिसत आहे.
त्या संशोधकांना लाख लाख धन्यवाद त्यांच्या पुढील प्रयत्नांना यश येउ दे जगावर उपकार होतील