देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी बीएसएनएलने व्हॅलेंटाईन डेनिमित्त तरुणांसाठी ऑफर दिली आहे.
मुंबई- देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी बीएसएनएलने व्हॅलेंटाईन डेनिमित्त तरुणांसाठी ऑफर दिली आहे. तरुणांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त २० एमबी डेटा फक्त ४ रुपयांत उपलब्ध करुन द्यायचे बीएसएनएलने ठरवले आहे.
१३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत ही ऑफर असून प्रिपेड मोबाईल डेटावर १० टक्के अतिरिक्त डेटा या कालावधीत मिळणार आहे. त्याशिवाय एक दिवसासाठी ४ रुपयांत २० एमबी डेटा लाँच केला आहे. त्यामुळे तरुणाई फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर जोडलेली राहील.
बीएसएनएलचे ग्राहक मोबिलिटी संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, यंदा व्हॅलेंटाईन डेला ब्लॅक आऊट डेच्या बाहेर ठेवले आहे.
सर्व मोबाईल धारकांना ही सवलत घेता येईल. त्याशिवाय नेटवर १३० एसएमएस (लघु संदेश) १२ रुपयांत, ३८५ एसएमएस ३१ रुपयांत आणि ८६० एसएमएस ५२ रुपयांत अशीही योजना आहे.
20 रुपयात 20 mb काय आम्ही पागल आहोत काय?
इतर कंपन्या 27 रुपयात 150 mb डेटा देत आहेत, हे बहुदा BSNL ला माहिती नसावे..