भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली – भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देणारी नोटीस पाठवली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गडकरींचा भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत समावेश केल्याने संतापलेल्या गडकरींनी त्यांना ही नोटीस पाठवली. केजरीवालांनी येत्या तीन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा तुमच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करु असा इशारा गडकरींनी या नोटीसमध्ये दिला आहे.
केजरीवालांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे, चुकीचे आणि आधरहीन असल्याचा दावा गडकरींनी केला आहे. दिल्ली प्रमाणेच देशाच्या इतर भागातही चमत्काराची अपेक्षा बाळगून असलेल्या आपच्या अरविंद केजरीवालांनी काल भ्रष्टाचारी नेत्यांची यादी सादर केली. या यादीमध्ये गडकरींच्या नावाचाही समावेश आहे. आगामी निवडणूकीत आप या भ्रष्ट नेत्यांना पराभूत करणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
purti che kay ?????