देशाचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर केले असून राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखाते सोपवण्यात आले आहे.
नवी दिल्ली- देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर केले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जनसंपर्क, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ आणि अन्य मंत्र्यांकडे न दिलेली महत्वाची खाती, राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखाते, अरूण जेटलींकडे अर्थ व संरक्षण खाते, सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, सदानंद गौडांकडे रेल्वे मंत्रालय, वेंकय्या नायडूंकडे नगर विकास, नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक व जहाज बांधणी खाते, मनेका गांधींकडे महिला व बालकल्याण मंत्री खाते सोपवण्यात आले आहे.
मंत्री आणि खाते
मंत्री |
खाते |
नरेंद्र मोदी (पंतप्रधान) |
वैयक्तिक, जनसंपर्क, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा, अंतराळ आणि अन्य मंत्र्यांकडे न दिलेली महत्वाची खाती |
राजनाथ सिंग | गृह |
सुषमा स्वराज |
परराष्ट्र मंत्रालय आणि जलवाहतूक |
अरुण जेटली |
अर्थ व संरक्षण (अतिरिक्त कार्यभार) |
व्यंकय्या नायडू |
नगर विकास, गृह निर्माण, संसदीय कामकाज |
नितीन गडकरी |
रस्ते वाहतूक व जहाज बांधणी |
डी.व्ही.सदानंद गौडा |
रेल्वे |
उमा भारती |
जल संसाधन, गंगा स्वच्छता अभियान |
नजमा हेपतुल्ला |
अल्पसंख्याक कल्याण |
गोपीनाथ मुंडे |
ग्रामविकास, पंचायत राज आणि पेय जल |
रामविलास पासवान |
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण |
कलराज मिश्र |
लघु आणि मध्यम उद्योग मंत्री |
मनेका गांधी |
महिला व बालकल्याण |
अनंत कुमार |
रसायन आणि खत |
रविशंकर प्रसाद |
दूरसंपर्क,माहिती तंत्रज्ञान, कायदा आणि न्याय |
अशोक गजपती राजू |
नागरी उड्डाण मंत्री |
अनंत गीते |
अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग |
हरसिम्रत कौर बादल |
अन्न प्रक्रिया |
नरेंद्र सिंग तोमर |
कोळसा, पोलाद, कामगार आणि रोजगार |
जूएल ओराम |
आदिवासी विकास मंत्री |
राधा मोहन सिंग |
कृषी |
थावरचंद गेहलोत |
सामाजिक न्याय आणि सबलीकरण |
स्मृती इराणी |
मनुष्यबळ विकास |
डॉ.हर्ष वर्धन |
आरोग्य आणि कुटूंब कल्याण |
व्ही.के.सिंग |
ईशान्य भारत विकास, परराष्ट्र मंत्रालय आणि जलवाहतूक |
राव इंदरजित सिंग |
नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अमलबजावणी, संरक्षण |
संतोष गंगवार |
कापड, संसदीय कामकाज, जल स्त्रोत, नद्यांचा विकास आणि गंगा शुद्धीकरण |
श्रीपाद नाईक |
सांस्कृतिक आणि पर्यटन (स्वतंत्र कार्यभार) |
धर्मेंद्र प्रधान |
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार) |
सरबंदा सोनोवाल |
मनुष्यबळ विकास आणि युवा व क्रिडा |
प्रकाश जावडेकर |
माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि संसदीय कामकाज राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) |
पियुष गोयल |
उर्जा राज्य मंत्री |
डॉ.जितेंद्र सिंग |
विज्ञान आणि तंत्रज्ञान, भू विज्ञान राज्य मंत्री आणि पंतप्रधान कार्यालय (स्वतंत्र कार्यभार) |
निर्मला सीतारामन |
वाणिज्य, उद्योग आणि अर्थ राज्य मंत्री |
जी.एम.सिद्धेश्वरा |
नागरी उड्डाण राज्य मंत्री |
मनोज सिन्हा |
रेल्वे राज्य मंत्री |
निहाल चंद |
खते आणि रसायने राज्य मंत्री |
उपेंद्र कुशवाह |
ग्रामिण विकास, पंचायत राज आणि पेय जल राज्य मंत्री |
पॉन राधाकृष्णन |
अवजड उद्योग राज्यमंत्री |
किरेन रिजीजू |
गृह राज्य मंत्री |
कृष्ण पाल गुज्जर |
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलवाहतूक राज्य मंत्री |
संजीव बलियान |
कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री |
मनसुखभाई वसावा |
आदिवासी विकास राज्य मंत्री |
रावसाहेब दानवे |
ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्य मंत्री |
विष्णुदेव सहाय |
कोळसा, पोलाद, कामगार आणि रोजगार राज्य मंत्री |
सुदर्शन भगत |
सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री |
मोदियुगाचीचांगली सुरवात खरे पहाता आत्ता जनतेचे राज्य आले अहये येणाऱ्या काळात देशाचा विकास झ्हाल्याशिवाय रहाणार नाही मोदी सरकारला मनापासून शुभचा