शेजारील राष्ट्र हे हितचिंतक असल्याचे संबोधत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवत राहणार असल्याचे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शाह गिलानी याने केले आहे.
श्रीनगर – शेजारील राष्ट्र हे हितचिंतक असल्याचे संबोधत जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवत राहणार असल्याचे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शाह गिलानी याने केले आहे.
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि इन्शाह अल्ला भविष्यातही हे झेंडे फडकत राहणार. पाकिस्तानचा हे शेजारील राष्ट्र आहेत तसेच ते हितचिंतक असल्याचे गिलीनीने म्हटले आहे.
१५ एप्रिल २०१५ पासून काश्मीरमधील फुटीरतावादींच्या रॅलीमध्ये वारंवार पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याच्या घटना घडल्या आहेत. १५ एप्रिल रोजी फुटीरतावादी नेता मसरत आलमच्या सुटकेनंतर श्रीनगरमध्ये झालेल्या सभेत पाकिस्तानी झेंडे फडकावण्यात आले होते तसेच पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या होत्या.
या कृत्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणी मसरत आलमला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटकही करण्यात आली.
याला पाकिस्तानात हाकला