सलामीलाच भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानी संघ अद्याप सावरलेला नसताना पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
कराची – सलामीलाच भारताकडून झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तानी संघ अद्याप सावरलेला नसताना पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट ल्युडेन यांनी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांकडे पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूं विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे.
खेळाडूंकडून अशी अपमानास्पद वागणूक मी सहन करु शकत नाही त्यापेक्षा मी राजीनामा देईन असे ल्युडेन यांनी पीसीबी अध्यक्षांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. शाहीद आफ्रिदी, अहमद शेहजाद आणि उमर अकमल या तिघांविरोधात ल्युडेन यांनी तक्रार केली आहे.
सराव सत्रा दरम्यान या तिघांनी आपल्याशी गैरवर्तणूक करत शिवीगाळ केली असे ल्युडेन यांनी म्हटले आहे. सराव सत्रा दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू सहकार्य करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या विश्वचषकातील पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बेशिस्त वर्तनाची ही दुसरी घटना आहे. याआधी जेवणासाठी हॉटेलबाहेर पडल्यानंतर दिलेल्या वेळेपेक्षा ४५ मिनिट उशिराने हॉटेलवर परतल्याने शाहीद आफ्रिदीसह आठ पाकिस्तानी क्रिकेटपटूंना संघ व्यवस्थापनाने आर्थिक दंड ठोठावला होता.
कधी सुधरनार रे बाबानो तुम्ही ????????