बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनची एका टिव्ही चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनची एका टिव्ही चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.
मुलाखतीमध्ये भूतकाळाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सनीने शांतपणे उत्तरे दिली. मात्र, यावर बॉलिवूडमधील कलाकारांसह अनेकांनी मुलाखतकार भुपेंद्र चौबे यांच्यावर आक्षेप घेतला आहे.
‘मस्तीजादे’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या सनी लिऑनने एका टीव्ही चॅनलला नुकतीच एक मुलाखत दिली.
तीस मिनिटे सुरू असलेल्या या मुलाखतीमध्ये वारंवार तिच्या भूतकाळावर प्रश्न विचारण्यात आले. तरीही तिने त्याला उत्तरे दिली.
तुमच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला अभिमान आहे का, आमिर खान तुमच्याबरोबर काम करेल का, बॉलीवूडच्या भाषेत तुम्ही आयटम गर्ल आहात, असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले.
यानंतर भुपेंद्र चौबे यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. चौबे हे स्त्रीविरोधी असल्याची टीका सर्वत्र होत आहे. मुलाखतकाराचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे, अशा प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
तर बॉलिवूडमधील ऋषी कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्झा, सुशांत राजपूत या कलाकारांनी टीकेची झोड उठविली आहे.
पण सनीने मात्र न संतापता शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तर दिल्याने तिचे कौतुक केले जात आहे.
वेश्या जी अनेक पुरुषांबरोबर संभोग करते, हे विधान बरोबर आहे. तर भारतात वेश्या असणे ही अभिमानाची कृती आहे, हेच सनी लिओनने सिद्ध केले आहे. आता भारतीयांनी आपल्या मुली- सुना यांना सनी लिओनचे आदर्श सांगायचे का..