बहुप्रतिक्षित बाहुबली : दी कन्क्लुझन या चित्रपटाचा भाग लीक झाल्याचे समोर आले आहे.
हैदराबाद- बहुप्रतिक्षित बाहुबली : दी कन्क्लुझन या चित्रपटाचा भाग लीक झाल्याचे समोर आले आहे. संपादकीय विभागातील एकाने हा भाग लीक केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
हा चित्रपट कुठेही व्हायरल होऊ नये, यासाठी निर्माते युद्धपातळीवर प्रयत्न करत असतानाही चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्यातील तब्बल नऊ मिनिटांचा एक भाग लीक झाला असल्याचे माहीतगार सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नुकताच अभिनेता प्रभास याच्या जन्मदिनी या चित्रपटाचा फस्र्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
२८ एप्रिल २०१७ रोजी हा चित्रपट भारतभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बाहुबलीने कटप्पाला का मारले, या प्रश्नाचे उत्तर येणा-या या चित्रपटामध्ये असल्याचे म्हटले जाते. बाहुबली : दी कन्क्लुझन हा बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे.
बाहुबलीने कटप्पाला का मारले
Something is wrong & it happens all the time.