सर्वात कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहचलेल्या इस्त्रोवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षावर होत आहे.
नवी दिल्ली- सर्वात कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहचलेल्या इस्त्रोवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. भारताची मंगळ मोहीम सुरु होण्यापूर्वीच इस्त्रोने फेसबुकवर एक विशेष पेज तयार केले होते. तसेच इस्त्रोच्या मुख्य फेसबुक वेजवरून या मोहिमेचे अपडेट दिले जात होते. बुधवारी सकाळी मंगळ मोहिमेतील महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आणि याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण जगाने फेसबुकचा आधार घेतला. नासानेही ट्विटरवरुन इस्त्रोचे अभिनंदन केले.
We congratulate @ISRO for its Mars arrival! @MarsOrbiter joins the missions studying the Red Planet.
#JourneyToMars pic.twitter.com/lz90flOZLG
— NASA (@NASA) September 24, 2014
इस्त्रोने मंगळ मोहीम यशस्वी झाल्याचे जाहिर केलेल्या पोस्टला ३२ हजारहून अधिक लाईक्स, जवळ जवळ पाच हजार शेअर्स आणि तितक्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. इस्त्रोच्या मुख्य फेसबुक पेजला (/isromom) सहा लाख २८ हजाराहून अधिक लाइक्स तर मंगळमोहिमेच्या पेजला चार लाख ८४ हजारहून अधिक लाइक्स झाले आहेत.
तर इस्त्रोच्या @MarsOrbiter ट्विटरवर काही तासातच फॉलेअर्सची संख्या ५५ हजारांनी वाढली.
इतक नव्हे तर मंगळयानाचे एक स्वतंत्र ट्विटरवर खातेही सुरु करण्यात आले आहे. मंगळयानाच्या वतीने इस्त्रोमधील शास्त्रज्ञ ट्विट करत आहेत. सकाळी सुरु करण्यात आलेल्या मंगळयानालाही ट्विटरवर काही लाख फॉलोअर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे मंगळयानाने पोचल्यानंतर मंगळ ग्रहाशी संवाद सुरु केला. त्यानंतर ४० मिनिटांनी १० महिने प्रवास केलेल्या या यानाने बेकफास्ट करुन येतो असा ट्विट केला. मग मंगळयानाने या ग्रहाभोवती असलेल्या अमेरिकेच्या MarsCuriosity यानाशी संवाद साधला. मंगळयान आणि MarsCuriosity यान यांच्यातील संवाद नऊ हजाराहून अधिक जणांनी रीट्विट केला आहे.
I’ll be back after breakfast. Good ol’ sunlight. It’s good for your battery. — ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter) September 24, 2014
Howdy @MarsCuriosity ? Keep in touch. I’ll be around.
— ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter) September 24, 2014
स्विस बँकेत असलेला भारतीय चोरांचा काळा पैसा जर ” इस्रो ” ला मिळाला तर कदाचित ” इस्रो ” प्लुटो
ग्रहावर सुद्धा ” प्लुटो ओर्बितोर “( प्लुटो यान ) पाठवू शकेल , जय हो इस्रो !!!