‘फटाके आम्हीच उडवू’ म्हणत दर्पोक्ती करणा-या भाजपा-शिवसेनेला कुडाळच्या सुज्ञ मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.
कुडाळ- ‘फटाके आम्हीच उडवू’ म्हणत दर्पोक्ती करणा-या भाजपा-शिवसेनेला कुडाळच्या सुज्ञ मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार वैभव नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती.
मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झंझावाती प्रचाराने कुडाळवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करत काँग्रेसचा झेंडा रोवला. आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकल्या असून, शिवसेनेची कुडाळवासीयांनी केवळ ६ व भाजपाची अवघ्या एका जागेवर बोळवण केली. एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या या विजयामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याची लाट पसरली आहे.
राज्यात सत्तेवर असणा-या भाजपा-शिवसेनेला कुडाळच्या मतदारांनी साफ नाकारले आहे. या निवडणुकीत अफाट पैसा व सत्तेचा अनिर्बंध वापर करूनही सेना-भाजपाचे झालेले पानिपत भविष्यातील बदलांची नांदी आहे.
कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूकसर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र सततच्या घोषणा, फसवी आश्वासने व दहा वर्षात कुडाळ शहराच्या विकासाबाबत शिवसेनेकडून झालेला अपेक्षाभंग यामुळे मतदारांनी पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्णय घेतला. कुडाळच्या राजकारणातील पक्षबदलू संजय पडते, काका कुडाळकर, अभय शिरसाट, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक आदींना कुडाळच्या जनतेने धूळ चारली.
कुडाळ नगरपंचायतीसाठी कॉँग्रेसने सर्वच वॉर्डात नवीन उमेदवार दिले होते. मतदारांनीही प्रामुख्याने नव्या तरूण उमेदवारांना संधी दिली. १७ पैकी ४ जागांवर ग्रामपंचायतीत काम करणारे अनुक्रमे विनायक राणे, संध्या तेरसे, राकेश नेमळेकर, रेखा काणेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यापैकी विनायक राणे व संध्या तेरसे हे विजयी झाले तर रेखा काणेकर यांचा अवघ्या ७ मतांनी पराभव झाला आहे.
दोन वेळा ग्रामपंचायतीवर निवडून गेलेले सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक यांना तर काँग्रेसचे नवखे उमेदवार ओंकार सुधीर तेली यांनी घरी पाठवले.ओंकार तेली यांनी ४४५ मते घेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला. उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांचाही विनायक राणे यांनी दारूण पराभव केला.
कुडाळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्नेहल संजय पडते या सेनेच्या तिकिटावर कुडाळ शहर बाजारपेठेतील प्रभाग क्र.४ मध्ये उभ्या होत्या. मात्र काँग्रेसचे उमेदवार सुनील बांदेकर यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाचे काका कुडाळकर यांच्या पत्नीचाही पराभव झाला.
प्रचारात सत्ता व पैशाचा मुबलक वापर करणा-या कुडाळकर व त्यांच्या सर्व सहका-यांचा दारूण पराभव झाला. भाजपाची एकमेव महिला उमेदवार विजयी झाली तरी त्याचे श्रेय हे सर्वश्री उषा आठल्ये यांना जाते. कुठल्याही राजकारणविरहीत भावनेने समाजात त्यांनी आतापर्यंत काम केले. येथे भाजपाचा कुठलाच करिष्मा दिसून आलेला नाही.
राज्यात सत्तेवर असणा-या भाजपा-शिवसेनेला कुडाळच्या मतदारांनी साफ नाकारले आहे. या निवडणुकीत अफाट पैसा व सत्तेचा अनिर्बंध वापर करूनही सेना-भाजपाचे झालेले पानिपत भविष्यातील बदलांची नांदी आहे. कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूकसर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.
मात्र सततच्या घोषणा, फसवी आश्वासने व दहा वर्षात कुडाळ शहराच्या विकासाबाबत शिवसेनेकडून झालेला अपेक्षाभंग यामुळे मतदारांनी पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कुडाळच्या राजकारणातील पक्षबदलू संजय पडते, काका कुडाळकर, अभय शिरसाट, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक आदींना कुडाळच्या जनतेने धूळ चारली.
कुडाळ नगरपंचायतीसाठी कॉँग्रेसने सर्वच वॉर्डात नवीन उमेदवार दिले होते. मतदारांनीही प्रामुख्याने नव्या तरुण उमेदवारांना संधी दिली. १७ पैकी ४ जागांवर ग्रामपंचायतीत काम करणारे अनुक्रमे विनायक राणे, संध्या तेरसे, राकेश नेमळेकर, रेखा काणेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यापैकी विनायक राणे व संध्या तेरसे हे विजयी झाले तर रेखा काणेकर यांचा अवघ्या ७ मतांनी पराभव झाला आहे.
दोन वेळा ग्रामपंचायतीवर निवडून गेलेले सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक यांना तर काँग्रेसचे नवखे उमेदवार ओंकार सुधीर तेली यांनी घरी पाठवले.ओंकार तेली यांनी ४४५ मते घेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला. उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांचाही विनायक राणे यांनी दारूण पराभव केला.
कुडाळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्नेहल संजय पडते या सेनेच्या तिकिटावर कुडाळ शहर बाजारपेठेतील प्रभाग क्र.४ मध्ये उभ्या होत्या. मात्र काँग्रेसचे उमेदवार सुनील बांदेकर यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाचे काका कुडाळकर यांच्या पत्नीचाही पराभव झाला.
प्रचारात सत्ता व पैशाचा मुबलक वापर करणा-या कुडाळकर व त्यांच्या सर्व सहका-यांचा दारूण पराभव झाला. भाजपाची एकमेव महिला उमेदवार विजयी झाली तरी त्याचे श्रेय हे सर्वश्री उषा आठल्ये यांना जाते. कुठल्याही राजकारणविरहित भावनेने समाजात त्यांनी आतापर्यंत काम केले. येथे भाजपाचा कुठलाच करिष्मा दिसून आलेला नाही.
सेना आमदार वैभव नाईक यांना चपराक
कुडाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता येईल, असा गर्व आमदार वैभव नाईक यांना झाला होता. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर व त्यांच्या शिलेदारांना कुडाळच्या मतदारांनी नाकारले. राज्यात सत्ता असतानाही कुडाळ शहराचा विकास करण्यास असमर्थ ठरलेल्या शिवसेना पदाधिका-यांना मतदारांनी चांगलीच चपराक लगावली.
विजयाचे श्रेय मतदारांना, कार्यकर्त्यांना देशात आणि महाराष्ट्रातही फार मोठया प्रमाणावर लोकांमध्ये परिवर्तन होत आहे. जी लाट किंवा हवा आपण म्हणत होतो ती आता संपलेली आहे. जनतेला कळून चुकले आहे की, आपली फसवणूक झाली आहे.
म्हणूनच लोक आता भाजपा-सेनेचा विचार न करता पुन्हा काँग्रेसचा विचार करू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक. कुडाळमधील या विजयाचे श्रेय मी सर्व मतदारांना आणि कार्यकर्त्यांना देतो, अशी भावना श्री. नारायण राणे यांनी व्यक्त केली.
कुडाळ नगरपंचायत विजयी उमेदवार
» प्रभाग क्र. १ महेंद्र वेंगुर्लेकर (शिवसेना)
» प्रभाग क्र. २ ओंकार तेली (काँग्रेस)
» प्रभाग क्र. ३ देवानंद काळप (शिवसेना)
» प्रभाग क्र. ४ सुनील बांदेकर (काँग्रेस)
» प्रभाग क्र. ५ आश्विनी गावडे (काँग्रेस)
» प्रभाग क्र. ६ अनंत धडाम (काँग्रेस)
» प्रभाग क्र. ७ सरोज जाधव (काँग्रेस)
» प्रभाग क्र.८ एजाज नाईक (अपक्ष)
» प्रभाग क्र. ९ श्रेया गावंडे (शिवसेना)
» प्रभाग क्र. १० गणेश भोगटे (शिवसेना)
» प्रभाग क्र. ११ साक्षी सावंत (काँग्रेस)
» प्रभाग क्र. १२ संध्या तेरसे (काँग्रेस)
» प्रभाग क्र. १३ उषा आठले (भाजपा)
» प्रभाग क्र. १४ मेघा सुकी (शिवसेना)
» प्रभाग क्र. १५ सायली कुंभार-मांजरेकर (काँग्रेस)
» प्रभाग क्र. १६ प्रज्ञा राणे (शिवसेना)
» प्रभाग क्र. १७ विनायक राणे (काँग्रेस)
राणे साहेबांवर विश्वास दाखवणा-या कुडाळच्या सुज्ञ जनतेचे मन:पूर्वक आभार…
एकच साहेब राणे साहेब…
सिंधुदुर्ग येथील मतदारांनी राणे साहेबानवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.
कुडाळवासीयांना चागली बुद्धि सुचली. कुडाळवासी यांचे आभार S