भारतीय वंशाच्या जे. वाय. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंगापूर- भारतीय वंशाच्या जे. वाय. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे, पण तोपर्यंत पिल्लई यांची हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंगापूरचे मावळते राष्ट्रपती टोनी टान केंग याम यांनी गुरुवारी आपला सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. २३ सप्टेंबर रोजी सिंगापूरच्या नव्या राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असल्याने तोपर्यंत पिल्लई हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहणार आहेत.
Great