फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सने नायजेरियावर २-० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
ब्राझिलिया- फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सने नायजेरियावर २-० गोल फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फ्रान्सकडून पॉल पोग्बा याने अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नायजेरियाच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सच्या आघाडीत वाढ झाली आणि त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
गटवार साखळी सामन्यात केवळ एक विजय मिळवून बाद फेरीत आलेला नायजेरियाचा संघ धक्कादायक निकाल नोंदवणार का याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र इतिहास फ्रान्सच्या बाजूने होता. त्यांनी आजवर जेव्हा जेव्हा गटवार साखळी सामन्याचा अडथळा पार केला आहे. तेव्हा त्यांनी किमान उपांत्य फेरी गाठली आहे. हा इतिहास कायम ठेवत त्यांनी आपले स्पर्धेतील वाटचाल कामय ठेवली आहे.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळेच दुस-या सत्रात फ्रान्स आणि नाजयेरिया या दोन्ही संघांनी आक्रमक खेळी केल्या. फ्रान्सने गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर ७९व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या पासवर पॉल पोग्बाने गोल करुन फ्रान्सला १-० अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. सामना संपन्यासाठी केवळ ११ मिनिटे शिल्लक असताना केलेल्या या गोलमुळे विजयासाठी फ्रान्सला केवळ चेंडू स्वतःकडे ठेवण्याचे काम करायचे होते. त्याच ९२व्या मिनिटाला नायजेरियाच्या जोसेफ योबोने स्वयंगोल करत फ्रान्सला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली आणि २-० गोल फरकाने फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्सचा मुकाबला जर्मनी आणि अल्जीरिया यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.
A million thanks for posting this inaoimftron.