जोधपूरचे मुख्य आयकर आयुक्त पी. के. शर्मा यांच्यासह दोन अधिका-यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाच घेताना अटक केली आहे.
नवी दिल्ली- जोधपूरचे मुख्य आयकर आयुक्त पी. के. शर्मा यांच्यासह दोन अधिका-यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाच घेताना अटक केली आहे.
आयुक्त पी. के. शर्मा आणि त्यांचे कनिष्ठ आयकर अधिकारी शैलेंद्र भंडारी यांना लाच प्रकरणी मंगळवारी अटक केल्याचे सीबीआय अधिका-यांनी बुधवारी सांगितले. दोघांनाही १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
एका ज्वेलरी दुकानात ही रक्कम स्विकारताना भंडारी हे सीबीआयच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले. भंडारी यांनी आपण हे शर्मा यांच्या सांगण्यावरुन व्यवहार केल्याचे सांगितले. यामुळे दोघांनाही ताब्यात घेतले असून यात आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा सीबीआय अधिकारी पुढील तपास करत आहेत.
बेमोसम बरीश के कारण जनता हैराण है. ……………..और हम परेशान है ………….आपसे…….