कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते कोचूवेलीदरम्यान सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
मुंबई- कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता आणखी एक नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते कोचूवेलीदरम्यान सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांच्या उपस्थित या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. येत्या २७ जानेवारीपासून आठवडय़ातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी एलटीटी स्थानकावरून ही गाडी सुटेल.
२२११३ या क्रमांकाची ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेरनेम, मडगाव, कारवारमार्गे कोल्लम आणि शेवटी कोचूवेली स्थानकात दाखल होईल. तर परतीच्या प्रवासात २२११४ या क्रमांकाची ही गाडी कोचूवेली येथून दर गुरुवारी आणि सोमवारी धावेल.
या गाडीला एकूण १७ डबे जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
सध्या कोकण कन्या,राज्यराणी,मांडवी आणि दोन प्यासेंजर या गाड्यांची डेटिंग लिस्ट पाहता कोकण वासियांसाठी एक नवीन गाडी सुरु झाली पाहिजे.
कोकण मार्गावरून निम्याहून अधिक गाड्या ह्या दक्षिणेकडे जातात तसेच ठराविक ठिकाणी थांबे व गाड्यांच्या रात्री अपरात्री पोहोचण्याच्या वेळा यामुळे ह्या गाड्यांचा कोकणी माणसांना फारसा उपयोग होत नाही.