ई-कॉमर्समध्ये आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने अँड्रॉइड अॅप दाखल केले आहे.
ई-कॉमर्समध्ये आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने अँड्रॉइड अॅप दाखल केले आहे. या अॅपमुळे युझर्सना फ्लिपकार्टवरील खरेदी अधिक सहजपणे करता येणार आहे.
या अॅपच्या मदतीने युझर्सना आवडलेल्या वस्तूची माहिती फोन, एसएमएस, ई-मेल आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत पोहचवता येणे शक्य होणार आहे. या अॅपमध्ये फ्लिपकार्टमधील विविध ऑफर्स आणि अन्य माहिती ठळकपणे दाखवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या सहाय्याने युझर्स व्हॅइस सर्च देखील करु शकतील. फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणेच या अॅपवर वस्तूची खरेदी, त्याचे स्टेटस जाणून घेता येते.
या अॅपवर ऑफलाइन वस्तू सर्च करणे, वस्तू मोठ्या आकारात पाहणे, नेट बँकिंगच्या सहाय्याने वस्तू विकत घेणे आदी फिसर्च देण्यात आले आहे.
ई-कॉमर्समध्ये अशा प्रकारचे अॅप उपलब्ध करुन देणारे पहिली कंपनी असल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
फ्लिपकार्टच्या अॅपवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
samsag mobail