केंद्र सरकारच्या सर्व नोक-यांमध्ये अपंगांसाठी ३ टक्के जागा राखून ठेवाव्यात, केवळ ही नोकरी देतानाच नव्हे तर बढती देतानासुद्धा त्यांना तीन टक्के जागा राखीव असाव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अपंगांसाठी काम करणा-या एका संघटनेने केलेल्या अर्जावरून हे प्रकरण निर्माण झाले आहे. २००५ सालापासून या संबंधात सर्वोच्च न्यायालय निर्णय देत आलेले आहे. मात्र अपंगांना आरक्षण देण्याच्या बाबतीत प्रत्यक्षात गंभीरपणे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आता पुन्हा एकदा याबाबत आदेश द्यावा लागला आहे. केंद्र सरकारच्या वकिलांनी या संबंधात आपले म्हणणे मांडताना बढतीमध्ये आरक्षण असू नये, असे सरकारला वाटते, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नेमकेपणाने सूचना दिल्या आहेत आणि बढतीमध्येसुद्धा तीन टक्के जागा अपंगांना राखीव असल्याच पाहिजेत, असे बजावले. या मुद्दय़ामध्ये केंद्र सरकारचा दृष्टिकोन व्यक्त होतो. २००५ साली केंद्र सरकारने ए, बी, सी, डी या चारही श्रेणीतील आरक्षणाचे नियम आरक्षणाच्या सगळ्या हक्कदारांना सारखे असू नयेत, असे म्हटले होते. याचा अर्थ असा की, अपंगांना आरक्षण देताना ते केवळ नियुक्ती करताना द्यावे. म्हणजेच केंद्र सरकार हे आरक्षण सहानुभूती म्हणून देत आहे, हक्क म्हणून देत नाही, असाही याचा अर्थ होतो. सरकारी वकिलांनीसुद्धा या अर्थानेच प्रतिपादन केले होते. अपंग व्यक्तीला बढतीत आरक्षण ठेवल्यास त्यांच्यापेक्षा सेवेत ज्येष्ठ असणा-याच्या पुढे ते जातात आणि त्यामुळे त्या ज्येष्ठ अधिका-यांच्या मनात नराश्य निर्माण होते, असे सरकारी वकिलांनी म्हटले होते; परंतु एकदा आरक्षणाचे तत्त्व मान्य केल्यास आरक्षणाचा लाभ असणारा वर्ग आरक्षणामुळे आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींच्या पुढे जाणार हे गृहितच आहे. असे असताना तो हक्क अपंगांना नको, असा सरकारचा दृष्टिकोन असणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आता धोरणाच्या गाभ्याची आठवण सरकारी वकिलांना करून दिली. खरे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानेही असाच आदेश दिला होता. केंद्र सरकारने तो आदेश न मानता त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले. पण ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देशातल्या लाखो अपंगांच्या जीवनामध्ये आशेचा किरण जागवणारा ठरणार आहे. राज्याराज्यांमध्ये अपंगांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीत ढिलाई दाखवली जात होती. त्याविरुद्ध फारसे कोणी आंदोलनही करत नव्हते. ‘नॅशनल कॉन्फेडरेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ डिसेबल्ड’ या संघटनेने हा लढा उभा केला. हे तीन टक्के आरक्षण लागू करताना त्यांच्या प्रकारांचेसुद्धा विवरण सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहे. अंध, बहिरे आणि मुके अशा अपंगांना हे आरक्षण असावे आणि ते प्रत्येक प्रकारात एक टक्का एवढे असावे, असे न्यायालयाने बजावले आहे. २००५ सालचा केंद्र सरकारचा तो आदेश आता रद्द ठरवण्यात आला आहे ज्यातून अपंगांना बढतीत आरक्षण नाकारलेले होते.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
Draftsman Mechanical / B .A . Typist – मराठी – ३० , इंग्लिश – ४०
Physical Handicap – Hearing – 69 %