चिक्की खरेदी घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
मुंबई – चिक्की खरेदी घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दांडी मारण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ही माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही बाब उघड झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिवांच्या कार्यालयातून ११ डिसेंबर २०१४ पासून झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये कोणते मंत्री किती वेळा उपस्थित होते यांची माहिती मागितली होती. त्यांनी प्राप्त केलेल्या माहितीनुसार ११ डिसेंबर २०१४ ते २३ जून २०१५ या कालावधीत मंत्रिमंडळाच्या एकूण २८ बैठका झाल्या.
या बैठकांमध्ये सर्वात जास्त दिवस गैरहजर राहणा-यांमध्ये महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री दीपक सावंत, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आहेत.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सर्व बैठकांना हजेरी लावली आहे. या २८ मंत्रिमंडळ बैठकांपैकी सर्वात जास्त ९ बैठकांना पंकजा मुंडेंनंतर एकनाथ शिंदे ७, दीपक सावंत ६, सुधीर मुनगंटीवार ५, राजकुमार बडोले ५ दिवस गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त दिवस गैरहजर राहणा-यांमध्ये पहिला क्रमांक महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पटकावला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगले यांच्या माहितीवरून स्पष्ट होते.
मंत्री कोण केले