याकूब मेमनला दिलेल्या फाशीचा बदला मी घेणारच, असे टायगर मेमन याने मुंबईतील घरी फोन करून सांगितल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मुंबई- याकूब मेमनला दिलेल्या फाशीचा बदला मी घेणारच, असे टायगर मेमन याने मुंबईतील घरी फोन करून सांगितल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मुंबई १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमन याला ३० जुलै रोजी फाशी देण्यात आली. त्यादिवशी पहाटे याकूबचा भाऊ व मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार फरार मुश्ताक ऊर्फ टायगर मेमन याने मुंबईत फोनवरुन आईशी संपर्क साधला. याकूब मेमनची आई खलिफा यांनी टायगरचा हा कॉल घेतला होता. माहिममध्ये अल हुसैनी नावाच्या बिल्डिंगमध्ये मेमन कुटुंबीय रहातात.
यावेळी कुख्यात डॉन टायगर मेमन याने ‘मै उनको नहीं छोडूंगा, इसकी किमत चुकवाऊंगा’, असा धमकीचा इशारा दिला आहे. मात्र, हा कॉल इंटरनेटवरून करण्यात आल्याने तो नेमका कुठून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आईशी बोलताना टायगर सतत बदला घेण्याचीच भाषा करत होता. यानंतर हनिफा यांना रडू कोसळले. त्यांनी ‘बस हो गया, पहले की वजह से मेरा याकूब गया। अब और नहीं मैं देख सकती’, असे सांगत टायगरला काही न करण्याची विनंती केली.
मात्र ‘तुम रो मत अम्मी. इसका इनको इजाफा देना होगा’ असे म्हणत टायगर आपल्या मतावर ठाम होता.
तसेच टायगर आणि मेमन कुटुंबियांचे हे संभाषण उघड झाल्याने टायगर हा कुटुंबाच्या कायम संपर्कात असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वृत्ताला पोलिसांनी अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ या दैनिकात याबाबत वृत्त प्रकाशित झाले आहे. त्या अनुषंगाने टायगरने केलेल्या कॉलचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. टायगरच्या या धमकीमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या दक्षता पथकाने सदर संभाषण रेकॉर्ड केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. हा आवाज टायगर मेमनचाच असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तुज्यात दम असेल तर व एका बापाची अवलात असशील तर समोरून वार कर.. कुत्र्या सारखा मागून काय भोक्तोस रे….
// वन्दे मातरम भारत माता कि जय ! //