राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी केला.
निमच(मध्य प्रदेश)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी केला. संघावर प्रहार करण्याची एक ही संधी न सोडणा-या दिग्विजय सिंह यांनी निमच येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
आरएसएसकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पुरावे १९९२मध्येच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये ९२मध्ये सत्तेत आल्यानंतर संघाच्या सेवा भरती कार्यालयात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. या प्रशिक्षणा दरम्यान स्फोट होऊन एकाचा मृत्यू देखील झाल्याचा दावा सिंह यांनी केला.
मध्य प्रदेशमध्ये १९९३मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.
पाकिस्तान आनि चीन पेक्षाही भारताचा कोणी मोठा शत्रू असेल तर ते दिग्विजयसिंग आहेत. यांची शेपूट कितीही सरळ करा ती वाकडीच असते.