‘फ्रिडम २५१’ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून सकाळी सहा वाजल्यापासून त्याची बुकींग सुरू झाली. मात्र, मात्र जशी बुकिंगची वेळ आली तशी वेबसाईट क्रॅश झाली.
नवी दिल्ली- जगातील सर्वात स्वस्त असलेला ‘फ्रिडम २५१’ हा स्मार्टफोन बुधवारी लाँच करण्यात आला असून गुरूवार सकाळी सहा वाजल्यापासून त्याची बुकींग सुरू झाली. मात्र, मात्र जशी बुकिंगची वेळ आली तशी वेबसाईट क्रॅश झाली.
पहिल्याच दिवशी ‘फ्रिडम २५१’ च्या बुकींग वेळी ग्राहकांना चांगला झटका बसला. ‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनची www.freedom251.com या संकेतस्थळावर बुकींग सुरू झाली. कमी किंमतीत चांगले फिचर्स देणारा हा स्मार्टफोन घेण्यासाठी एकाचवेळी मोठ्या संख्येने ग्राहकांनी वेबसाईट चालू केली.
रिंगिग बेल्स या कंपनीच्या या स्मार्टफोनचे बुकिंग २१ फेब्रुवारी रात्री आठ वाजेपर्यंत करता येणार आहे. ५०० पेक्षा कमी स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे.
[EPSB]
‘हा’ नवा स्मार्टफोन अवघ्या २५१ रुपयात
रिंगिंग बेल्स या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त असा ‘फ्रीडम २५१’ नवा स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत अवघी २५१ रुपये आहे. [/EPSB]
Marathi