शहरात डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी मुझम्मील अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला ‘पोटा’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई- शहरात डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी मुझम्मील अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला ‘पोटा’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यातील अन्य दहा गुन्हेगार अन्वर अली, मोहम्मद कमील, नूर मोहम्मद यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
विशेष पोटा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ही शिक्षा ठोठावली. तसेच गुन्हेगारांकडून ९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातील काही निधी जिल्हा कायदा प्राधिकरण व अन्य रेल्वेला देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले.
२००२ व २००३ मध्ये मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले स्थानकांजवळ रेल्वे गाडयांमध्ये हे तीन भीषण बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या तिन्ही बॉम्बस्फोटांचा कट एकत्र रचण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर त्यांचा खटला एकत्रित चालवण्यात आला.
मागील १४ वर्षापासून सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने गेल्या आठवडयात १० जणांना दोषी ठरवले तर तीन जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली होती. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सर्व आरोपींवर हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे या भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत तसेच आर्म्स अॅक्ट, रेल्वे अॅक्ट, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स आणि पोटाअंतर्गत दोषी ठरवून या प्रकरणातील तीन दोषींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
तर, साकीब नाचन, नसीर मुल्ला, आतीक मुल्ला, गुलाम अकबर कोटल यांना दहा वर्षाची शिक्षा सुनावली. या चौघांनीही आठ वर्षाची शिक्षा पूर्वीच भोगली असल्याने त्यांना फक्त दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यात १५३ जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. ३० साक्षीदारांची बचाव पक्षांच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली.
दरम्यान, जमात-उलेमा-ई-महाराष्ट्र या संस्थेने या ‘पोटा’ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे. तसेच दहशतवादाशी संबंधित खटले दोन वर्षात निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जावीत, अशी मागणी या संस्थेने केली आहे.
मुंबई बॉम्बस्फोट
» ६ डिसेंबर २००२ – मुंबई सेंट्रल टर्मिनस, मॅकडोनल्ड रेस्टॉरंट
» २७ जानेवारी २००३- भाजीबाजार, विलेपार्ले
» १३ मार्च २००३ – सीएसटी-कर्जत लोकल महिला डब्बा
[EPSB]
२००२-०३ साखळी बॉम्बस्फोट,१० जण दोषी
मुंबईत २००२-२००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा विशेष न्यायालयाने निकाल दिला.
[/EPSB]
त्या tera हि jananche tin tera vajvaiche hote,tighana सोडून dile,हत teri कि,!