ओदिशातील कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात शिकणा-या दोन अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे.
कोरापूट/बे-हामपूर- ओदिशातील कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात शिकणा-या दोन अल्पवयीन मुलींनी बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे.
यातील एक १२ ते १३ वर्षाची मुलगी चक्क सहावी इयत्तेत शिकत आहे तर दुसरी मुलगी दहावी इयत्तेत शिकत आहे. या प्रकरणी उमुरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कैलाश चरण ब्रह्मा आणि वसतीगृह अधिक्षक सबिता गुरु या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून हे उमरी आश्रम शाळा वसतीगृह चालवण्यात येते. दहावी इयत्तेत शिकणा-या या मुलीने चार फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिल्याची घटना घडली.
त्यापूर्वी बरोबर १२ दिवस अगोदर येथील सहावी इयत्तेत शिकणा-या मुलीने बाळाला जन्म दिला. मात्र वसतीगृह प्रशासनाने या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला तिच्या घरी नेऊन सोडले. या मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला कळवली नाही. ही मुलगी अप्परकेंडी गावची रहिवासी आहे.
दहावी इयत्तेतील मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हे दोन्ही प्रकार उघडकीस आले आहेत. शाळा प्रशासनाने या दोन्ही मुलींना आरोग्यसुविधा देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यामिनी सारंगी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे जयपोर विभागाचे पोलीस अधिक्षक राजेंद्र सेनापती यांनी सांगितले.
पिडीत १२ वर्षीय मुलीचे पालक मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. गेल्यावर्षी ती या शाळेत दाखल झाली होती. या मुलीने आपला एक नातेवाईकच यास जबाबदार असल्याचे तिने तीन फेब्रुवारी रोजी दिलेल्या अर्जात सांगितल्याचे ब्रह्मा यांनी सांगितले. त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजे चार फेब्रुवारी रोजी रात्री वसतीगृहाच्या स्वयंपाक कक्षातच तिने कळा येत असल्याचे स्वयंपाक करणा-या महिलेला सांगितले आणि तेथेच तिने मुलाला जन्म दिला.
या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत ३०० विद्यार्थी आहेत. यात १५० मुलींचा समावेश आहे.
अशाच प्रकारे दहावीतील विद्यार्थीनीनेही बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी सुकांता प्रधान उर्फ तूना या २४ वर्षीय इसमास अटक केली आहे. तूना याने या मुलीवर मे २०१४ मध्ये बलात्कार केला होता. याप्रकरणी सस्मिता परिदा आणि नमिता प्रधान हे दोन शिक्षक, मुख्याध्यापिका आशालता पाती आणि सेविका एस. बी. प्रधान यांना निलंबित केले आहे.
दोषी नराधमांचा लीन्गछेद्च केला पाहिजे त्याशिवाय जरब बसणार नाही.