दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच संचालक, विश्वस्त प्रमुख आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बापूसाहेब रेगे यांचे रविवारी निधन झाले.
मुंबई- दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच संचालक, विश्वस्त प्रमुख आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बापूसाहेब रेगे (८३) यांचे रविवारी रात्री साडेनऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दादर येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सकाळपासूनच ते उपचाराला साथ देत नव्हते. रविवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे पार्थिव बालमोहन विद्यामंदिर शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साडेदहा वाजता दादर येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
vachun khup vaait vaatle. dev tyanchya aatmyala shanti devo.