स्मार्टफोनमधील सॅमसंगचा वाढता दबदबा पाहता अॅपल कंपनीनेही ‘आयफोन ४’ पुन्हा लाँच करण्याचे ठरवले आहे.
मुंबई – स्मार्टफोनमधील सॅमसंगचा वाढता दबदबा पाहता अॅपल कंपनीनेही ‘आयफोन ४’ पुन्हा लाँच करण्याचे ठरवले आहे. नव्याने लाँच करण्यात येणा-या या आयफओनमध्ये आठ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे तर याची किंमत फक्त १५ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे अॅपलचे आयफोन घेण्याची हौस आता सर्वांनाच भागवता येणार आहे.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. अॅपलच्या आयफोनची किंमत तर अनेकांच्या आवाक्याबाहेरची असते त्यामुळे इच्छा असूनही कित्येकांना आयफोन वापरता येत नाही. मात्र आता हे शक्य आहे. अॅपल माफक दरात ‘आयफोन ४’ पुन्हा एकदा लाँच करत आहे.
२०१०मध्ये ‘आयफोन ४’ बाजारात लाँच करण्यात आला होता. सुरुवातीला ‘आयफोन ४’ ची किंमत २६ हजार ५०० इतकी होती. आता हाच फोन १५ हजारामध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच यामध्ये ‘पेबॅक’ आणि ‘ईएमआय’चीदेखील सुविधा देण्यात येणार आहे.
१५ ते २० हजारादरम्यान किंमती असलेल्या सॅमसंगच्या स्मार्टफोन्सना बाजारात मोठी मागणी आहे. याच धर्तीवर अॅपलने हा निर्णय घेतला आहे. ‘आयफोन ४’ चे उत्पादन ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आले होते. या फोनला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे मात्र इतर देशांच्या बाजारपेठेमध्ये अपेक्षित मागणी नसल्याने या फोनचे उत्पादन सुरु केले जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
Thank u prahar