सर्वोत्कृष्ट अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान आणि ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे शुक्रवारी निधन झाले.
मुंबई- सर्वोत्कृष्ट अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान आणि ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वीच या महान अभिनेत्याला चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने देण्यात आला होता. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खलनायकी भूमिका करत असताना त्यांनी वापरलेल्या विविध लकबीही प्रेक्षकांना प्रचंड भावल्या होत्या. सुरुवातीच्या काळात ‘अदालत’, ‘बडी बहेन’ यांसारख्या चित्रपटातल्या त्यांच्या खलनायकी भूमिका लक्षवेधी ठरल्या. १९६४नंतर आलेल्या ‘पूजा के फुल’ व ‘काश्मीर की कली’ या चित्रपटातल्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली. अभिनेता मेहमूद यांच्याबरोबरही त्यांची जोडी विशेष जमली. ‘साधू और शैतान’ या चित्रपटातली त्यांची भूमिका तर खलनायकापेक्षा सहनायकाची म्हणून गणली गेली. त्यात त्यांनी वेगवेगळया वेषात येऊन आपल्या अभिनयाची जादू दाखवली. १९६७मध्ये आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटातून त्यांनी चरित्र भूमिका करायला सुरुवात केली.
या चित्रपटातले त्यांच्यावर चित्रित झालेले ‘कस्मे वादे प्यार वफा सब..’ हे गीत विशेष गाजले. ‘व्हिक्टोरिया नं. २०३’ मधले अशोक कुमार यांच्या साथीने सादर केलेले ‘दो बेचारे बिना सहारे..’ हे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘डॉन’ मधली त्यांची भूमिका व ‘शराबी’मधली अमिताभच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. ‘जंजीर’मधले अमिताभ बरोबरच ‘यारी है इमान मेरा..’ या गीताला विसरणे शक्य नाही. १९९८ नंतर त्यांनी जवळजवळ सेवानिवत्ती स्वीकारली असली तरी काही चित्रपटांमध्ये पाहुणे कलाकार म्हणूनही ते चमकले आहेत.
[EPSB]
बेस्ट ऑफ प्राण(व्हिडिओ)
ज्येष्ठ अभिनेते प्राण यांनी खलनायक, सहाय्यक अभिनेता अशा विविध भूमिका यशस्वीपणे पेलल्या. प्राण यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्त प्राण यांचे काही गाजलेले संवाद….
[/EPSB]
bhavapuran shraddhanjali…