ज्यांच्या विनोदाने मराठी नाटक आणि चित्रपटांचा काळ गाजवला, अशाच आजच्या काळातल्या काही विनोदवीरांना सलाम करण्यासाठी झी टॉकीज यावर्षीपासून ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस्’ सुरू करत आहे.
मराठी चित्रपटांच्या आणि नाटकांच्या गौरवशाली इतिहासात विनोदी चित्रपट, नाटक आणि विनोदी अभिनेते यांचे योगदान नेहमीच अत्यंत मोलाचे ठरले आहे. रसिकांच्या चेह-यावर हसू फुलवणा-या विनोदवीरांची फार मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. पु. ल. देशपांडे, दादू इंदुरीकर, दादा कोंडके, राजा गोसावी, शरद तळवलकर, सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मिच्छद्र कांबळी यांच्यापासून ते आजच्या भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी यांच्यापर्यंत अनेक विनोदवीरांनी मराठी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे. ज्यांच्या विनोदाने मराठी नाटक आणि चित्रपटांचा काळ गाजवला, अशाच आजच्या काळातल्या काही विनोदवीरांना सलाम करण्यासाठी झी टॉकीज यावर्षीपासून ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस्’ सुरू करत आहे. अशा प्रकारचा हा मराठीतला पहिलाच पुरस्कार सोहळा असणार आहे.
दरवर्षी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यातील प्रत्येक कलाकृतीचा बाज वेगळा असतो आणि उद्देशही. त्यातल्या विनोदवीरांना शोधण्यासाठी एका परिक्षक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आहेत अशोक सराफ आणि सुकाणू समितीत दिलीप प्रभावळकर आणि सचिन पिळगावकर यांचा समावेश असणार आहे. तसेच भारती आचरेकर, विजय कोंडके, पुरूषोत्तम बेर्डे, निवेदिता सराफ, विनय येडेकर, किशोर प्रधान, चारुशीला साबळे, विश्वास सोहोनी, ज्योत्स्ना पडळकर आणि विजय पाटकर आदी परीक्षकांचाही या समितीत समावेश आहे.
या पुरस्कारांसाठी आपल्या कलाकृतींच्या प्रवेशिका ३ जुलै ते १८ जुलै दरम्यान पाठवता येतील. प्रवेशिकांचे फॉर्म www.zeetalkies.tv/comedy-awards या वेबसाइटवरुन डाऊनलोड करता येतील. झी टॉकीजचा हा पुरस्कार सोहळा २२ ऑगस्ट २०१४ रोजी होणार आहे.
मला ही कॉमेडी करायला खुप आवडते.
माझ ही एक स्वप्न आहे की मी ही कॉमेडी अवार्ड्स मधे झलकाव.
मी एक कलाकार आहे मी अनेक नाटक करतो माझा नाटकाचा एक ग्रुप आहे मला कॉमेडी करायला खूप आवडते
मला कॉमेडी अवार्ड्स मध्ये यायला खूप आवडेल .