मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात जखमी झाली असून तिच्या पायाला तसेच डोक्याला मार लागला आहे.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात जखमी झाली असून तिच्या पायाला तसेच डोक्याला मार लागला आहे. तिच्यावर सध्या माहिममधील हिंदुजा रुग्णालयात उपचार चालू आहे. मात्र, तिची प्रकृती स्थिर असल्याचे हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान अपघातात जखमी झालेल्या मुलीमुळे राज ठाकरे यांनी आपले कल्याण व डोंबिवली येथील नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत.
राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ही आपल्या मैत्रीणीसोबत स्कुटी या दुचाकीवरून रात्री साडेबाराच्या सुमारास जात असताना महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील सिग्नलजवळ दुचाकीचा ताबा सुटून उर्वशी व तिची मैत्रीण पडली. रस्त्यावरील खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीचा ताबा सुटला. यामध्ये उर्वशी खाली पडून फरफटत गेली. त्यामुळे तिच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी उर्वशीला जसलोक रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर पहाटे उर्वशीला पुढील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे सकाळी तिच्या पायावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
मात्र हिंदुजा रुग्णालयात उर्वशीवर उपचार करणा-या डॉ. संजय अगरवाल यांनी मात्र, त्यांना झालेली दुखापत किरकोळ स्वरूपाची असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले.
“रात्री साडेबाराच्या सुमारास जात असताना”
— लाज वाटली पाहिजे तिच्या बापाला…