रुग्णांना दिल्या जाणा-या नाश्ता तसेच जेवणाची चव चाखून पाहण्याची साधी तसदीही न घेणा-या महापौर सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी चक्क डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात येणा-या नाश्त्याची चव चाखत रुग्णालय व्यवस्थापनाची पाहणी केली.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना सकाळचा नाश्ता तसेच जेवण हे उत्तम दर्जाचे नसते. दुपारच्या जेवणात पाण्यासारखी डाळ आणि बेचव भाज्यांचा समावेश असतो. मात्र रुग्णांना दिल्या जाणा-या नाश्ता तसेच जेवणाची चव चाखून पाहण्याची साधी तसदीही न घेणा-या महापौर सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी चक्क डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात येणा-या नाश्त्याची चव चाखत रुग्णालय व्यवस्थापनाची पाहणी केली. रुग्णालयातील आहारगृहात तयार होणारे अल्पोपाहार मागवून चव चाखणा-या महापौरांना मागील वर्षीपेक्षा स्वस्तात भाजींचा पुरवठा करणा-यात येणा-या भाज्यांचा तसेच कांद्याची पाहणीही करणे सोयीचे वाटले नाही.
महापालिकेच्या केईएम, शीव व नायर या तीन प्रमुख रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना अधिक चांगल्या दर्जाचे मोफत अल्पोपाहार मिळावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी केल्यानंतर नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे १० रुपयांऐवजी २५ रुपयांचा अल्पोपाहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी महापालिकेच्या रुग्णालयात सुरू आहे.
मात्र रविवारी केईएम रुग्णालयातील स्वच्छता मोहिमेनंतर महापौर सुनील प्रभू यांनी डॉक्टरांना दिला जाणारा अल्पोपाहारच मागवून पोटपुजा करून घेतली. मात्र काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत कांद्याचे दर बाजारात ५० ते ६० रुपये प्रति किलो असताना केवळ १४ रुपये ५० पैशांमध्ये देण्याची तयारी दर्शवत मागील वर्षीच्या तुलनेतही अत्यंत स्वस्त दरात केल्या जाणा-या भाज्यांच्या पुरवठय़ाची माहितीही महापौरांना घेता आली नाही.
रुग्णांसाठी तयार होणा-या जेवणाची चव चाखून पाहण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे महापौरांसह शिवसेनेच्या अरविंद सावंत, बेस्ट समिती अध्यक्ष नाना आंबोले, हेमांगी चेंबूरकर, नंदू विचारे आदी मंडळींनीही डॉक्टरांच्या नाश्त्याबरोबरच नारळ पाणी पित रुग्णांना मिळणा-या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शिवसेनेची चमकेशगिरी पुन्हा उघड झाली.
Layakich ti, tyala aapan tari kaay karnar????