शेजारी राहणा-या मैत्रीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली.
नवी मुंबई- नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथील ही अल्पवयीन तरुणी तीन दिवस घरातून बेपत्ता होती. तीन दिवसानंतर घरी आल्यावर तिने घडला प्रकार आईला सांगितला. तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोबत घेऊन गेलेल्या शेजारील मैत्रिणीलाही गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.
शेजारी राहणारी २२ वर्षिय तरुणी वाढदिवसाच्या पार्टीला जायचे असे सांगून या १६ वर्षिय अल्पवयीन मुलीला घेऊन उरण येथे गेली. पण तीन दिवस झाले तरी ती मुलगी घरी आली नव्हती म्हणून पिडीत मुलीच्या आईनो पोलिसात तक्रार दाखल केली.
तीन दिवसानंतर पिडीत तरुणी घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. शेजारील तरुणीने आपल्याला फूस लावून उरण येथे नेल्याचे तसेच तेथे गेल्यानंतर एका तरुणाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या मुलीच्या आईने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली.
कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी संबंधित तरुणावर बलात्कार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या मुलीला फूस लावून नेणा-या तिच्या शेजारच्या तरुणीलाही या गुह्यात सहआरोपी केले आहे.
आपल्या मुलांवर खूप लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे,शेजारी असो किंवा नातेवाईक आंधळा विश्वास नको