बारमालक आणि दारूविक्रेत्यांच्या मदतीला अमूल कंपनी धावून आली आहे. बारऐवजी मिल्क बार सुरू करण्याचे प्रस्ताव अमूल कंपनीने ठेवला आहे.
मुंबई- बारमालक आणि दारूविक्रेत्यांच्या मदतीला अमूल कंपनी धावून आली आहे. बारऐवजी मिल्क बार सुरू करण्याचे प्रस्ताव अमूल कंपनीने ठेवला आहे. जवळपास १६ हजार बारमालक आणि दारूविक्रेत्यांना मिल्क बार सुरू करण्यासाठी अमूल कंपनीने आमंत्रित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गा लगतच्या ५०० मीटरच्या अंतरात असणारी दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार या परिसरात असलेल्या हॉटेल्स किंवा बारमध्ये दारूची विक्री करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
या निर्णयाचे एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे दारूविक्रेते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. अशातच अमूलने जवळपास १६ हजार बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्याची कल्पना ठेवली आहे.
दारू ,जुगार ,मावा ,गुटखा आणि मटका या सारख्या आयवैद्य धंद्यांना कायमचा आळा घालणे जरुरीचे आहे ,जर कोणी आढळल्यास त्यास अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा