काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधीपक्षाचे नेते व्हावे असे मत गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधीपक्षाचे नेते व्हावे असे मत गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.
‘जर राहुल यांना काँग्रेसचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी विरोधीपक्षाचे नेतेपद स्वीकारायला हवे. मला विश्वास आहे, की ते विरोधीपक्ष नेते म्हणून यशस्वी होतील.” असे सिंग यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले असून नव्या मंत्रिमंडळानेही कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेते पद घ्यावे