रोहित शेट्टीने आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘दिलवाले’ शीर्षक असलेल्या या चित्रपटात शाहरूख खान, काजोल, वरुण धवन आणि कृती सेन प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
त्यांच्याव्यतिरिक्त विनोद खन्ना, कबीर बेदी आणि ‘फुकरे’फेम वरुण शर्माही या चित्रपटात असणार आहेत. पण अगदी कमी लोकांना माहीत आहे की, रोहितचा खास मित्र अजय देवगणही या चित्रपटात काम करणार आहे, हे!
रोहितच्या जवळच्या मित्रानेच ही माहिती दिलीय. असो. या वर्षी अजय देवगण, अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि रेखाही आहे.
रोहितच्या चित्रपटाचं मात्र खास वैशिष्टय़ हे आहे की, १९९४मध्ये आलेल्या अजय देवगणच्याच ‘दिलवाले’ या चित्रपटाचं नाव या चित्रपटाला दिलं गेलं आहे. चित्रपटाच्या नावातील साधम्र्यता आणि काजोलचं कमबॅक यामुळेच रोहितने अजयला गळ घातली आणि अजयनेही त्याला होकार दिला.
यानिमित्ताने शाहरूख आणि काजोलही पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. पण अजय आणि शाहरूख मात्र पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.
दो दुश्मन साथमे फिल्म मे काम करेंगे ??? चमत्कार हो गया,!!!